Devendra Fadnavis : "आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:15 PM2022-12-08T16:15:12+5:302022-12-08T16:24:54+5:30

BJP Devendra Fadnavis : "आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने 157 च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे."

History was made in Gujarat Results 2022 under leadership of Narendra Modi says BJP Devendra Fadnavis | Devendra Fadnavis : "आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो"

Devendra Fadnavis : "आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो"

googlenewsNext

गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. एवढे मोठे यश 1995 पासून सत्तेत असलेल्या भाजपाला पहिल्यांदाच मिळाले आहे. गेल्या वेळी भाजपाला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसला टक्कर देण्याची आशा होती. परंतु आपला मतदान मोठ्याप्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचल्याचंही म्हटलं आहे. "आम आदमी पक्ष दिल्लीपुरता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो हेदेखील सिद्ध झालं आहे. प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये रचला इतिहास"

“भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने 157 च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. 27 वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरी गेली. विरोधी पक्षांना वाटलं 27 वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं" असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

 मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 10 हून अधिक केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांच्या 50 हून अधिक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त पंतप्रधानांनी गुजरातमध्ये 39 सभा घेतल्या आणि 134 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरात निवडणुकीत पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: History was made in Gujarat Results 2022 under leadership of Narendra Modi says BJP Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.