Gujarat Results 2022 : मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:19 PM2022-12-08T12:19:57+5:302022-12-08T12:27:42+5:30

Gujarat Results 2022 : 'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे.

Gujarat Results 2022 PM Narendra Modi and Amit Shah rallies and seats win | Gujarat Results 2022 : मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

Gujarat Results 2022 : मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

googlenewsNext

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होतील. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात राज्यातील 182 जागांवर मतदान झाले. त्याचवेळी, 5 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये भाजपाला राज्यात प्रचंड बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याची भाजपाला मोठी आशा आहे. त्याचवेळी भाजपा आणि काँग्रेससह आम आदमी पक्षाच्या सक्रिय सहभागामुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 10 हून अधिक केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांच्या 50 हून अधिक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त पंतप्रधानांनी गुजरातमध्ये 39 सभा घेतल्या आणि 134 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरात निवडणुकीत पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले.

पंतप्रधान मोदींनी कुठे घेतल्या सभा?

पंतप्रधान मोदींनी गांधीनगर जिल्ह्यात 5 सभा घेतल्या. याशिवाय त्याच्याकडे छोटा उदयपूर जिल्ह्यात 3, साबरकांठामध्ये 3, बनासकांठामध्ये 9, पाटणमध्ये 4, आणंदमध्ये 7, अहमदाबादमध्ये 21, भरूचमध्ये 5, खेडामध्ये 7, सुरतमध्ये 16, बनासकांठामध्ये 9, अरवल्लीमध्ये 3 आहेत. मेहसाणामध्ये 7, दाहोदमध्ये 6, वडोदरात 2, भावनगरमध्ये 7, सुरेंद्रनगरमध्ये 5, नवसारीमध्ये 4, वलसाडमध्ये 5, जुनागडमध्ये 5, राजकोटमध्ये 8 आणि जामनगरमध्ये 5 रॅली काढल्या.

अमित शाहंनी कुठे घेतल्या सभा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्वारका येथे तीन सभा घेतल्या. याशिवाय, गीर सोमनाथमध्ये 4, जुनागडमध्ये 5, कच्छमध्ये 6, तापीमध्ये 2, नर्मदामध्ये 2, आनंदमध्ये 2, बनासकांठामध्ये 9, अहमदाबादमध्ये 21, राजकोटमध्ये 8, सुरेंद्रनगरमध्ये 5, सुरतमध्ये 16, मेहसाणामध्ये 7, वडोदरात 2, अरवल्लीमध्ये 3, पंचमहलमध्ये 5 आणि गांधीनगरमध्ये 5 रॅली काढल्या.

पंतप्रधानांनी येथे एकापेक्षा जास्त वेळा दिली भेट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये 39 सभा घेतल्या आणि दोन रोड शोही केले. रोड शोच्या माध्यमातून त्यांनी 50 किलोमीटरचा प्रवास केला. पंतप्रधान मोदींनीही काही जिल्ह्यांना एकापेक्षा जास्त वेळा भेट दिली. त्यांचे बहुतांश कार्यक्रम अहमदाबादमध्ये झाले. येथे एकूण 21 जागा आहेत. गेल्या वेळी भाजपाने यापैकी 15 जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे पंतप्रधान मोदी 6 वेळा अहमदाबादला पोहोचले. याशिवाय पीएम मोदी तीन वेळा सुरत जिल्ह्यात पोहोचले. येथे 16 जागा आहेत. पंतप्रधानांनी गांधीनगर, बनासकांठा आणि मेहसाणा येथे प्रत्येकी तीन तीन कार्यक्रम केले.

पंतप्रधान मोदींप्रमाणेच गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावली. रिपोर्टनुसार, शाह यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. ज्या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान मोदी जाऊ शकले नाहीत, त्या जिल्ह्यांमध्येही शाह पोहोचले. शाह यांचे सर्वाधिक लक्ष अहमदाबाद, मेहसाणा आणि गांधीनगर येथे राहिले. या जिल्ह्यांमध्ये ते एकापेक्षा जास्त वेळा पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Gujarat Results 2022 PM Narendra Modi and Amit Shah rallies and seats win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.