शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वास्तूंवर कुदळ

By admin | Updated: February 1, 2016 02:59 IST

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तीव्र करीत जनजागृतीवर भर दिला, तरी गुप्तधनाच्या लालसेने अनेक जण सद्सद्विवेक बुद्धीला तिलांजली देतात

विवेक चांदूरकर ,  अकोलाअंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तीव्र करीत जनजागृतीवर भर दिला, तरी गुप्तधनाच्या लालसेने अनेक जण सद्सद्विवेक बुद्धीला तिलांजली देतात. याच मोहातून ऐतिहासिक, प्राचीन वारसा लाभलेल्या वास्तूंवर कुदळ चालवायलादेखील ते मागेपुढे पाहात नाहीत. मेहकर येथील कंचनीचा महाल, तसेच लोणार येथील काही मंदिरांमध्ये ठिकठिकाणी खोदलेले खड्डे याचीच प्रचिती देतात. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे ‘कंचनीचा महाल’ म्हणून एक वास्तू प्रसिद्ध आहे. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी कंचनी एक नर्तिका होती. तिचे नृत्य बघायला येणारे राजे-महाराजे तिला मौल्यवान दागिने भेट द्यायचे. ते दागिने या महालामध्ये दडविण्यात आले असल्याची अफवा आहे. दागिन्यांच्या हव्यासापोटी काहींनी महालात ठिकठिकाणी खड्डे खणले आहेत. त्याच्या मधोमध तर मोठा खड्डा आहे. ही वास्तू बघायला पर्यटक येतात. मात्र, खड्ड्यांमुळे त्यांना व्यवस्थित फिरता येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातातून तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी जगप्रसिद्ध असून, सरोवराच्या परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या आजुबाजूला देखील गुप्तधनप्राप्तीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष राज्यातील किल्ले, राजवाडे या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरातत्त्व खात्याची आहे. या खात्याच्या वतीने प्रत्येक ऐतिहासिक वास्तूजवळ एक कायमस्वरूपी चौकीदार ठेवण्याची गरज आहे. काही ठिकाणी चौकीदार नेमले असले, तरी ते या ठिकाणी हजर नसतात. त्याचा फायदा हे गुप्तधन शोधणारे घेतात व ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करतात.