शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

By admin | Updated: March 13, 2015 05:35 IST

आघाडी सरकारने १ एप्रिल २०१४ रोजी केलेली मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र

मुंबई : आघाडी सरकारने १ एप्रिल २०१४ रोजी केलेली मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यभर सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका असून, थकीत वाढीव मानधनासाठी १८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. गुरुवारी सर्व संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.याबाबत आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी सांगितले की, २०१४ साली सर्व संघटनांनी एकजूट करत दोन महिन्यांचा संप यशस्वीरीत्या पार पाडला होता. त्यानंतर काढलेल्या महामोर्चानंतर सरकारने धोरणात्मक निर्णय घेत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रुपये, तर मदतनिसांच्या मानधनात ५०० आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ४५० रुपयांची तुटपुंजी वाढ केली होती. १ एप्रिल २०१४ पासून ही मानधनवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षभरापासून मंजूर झालेली मानधनवाढ कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. याउलट आघाडी सरकारने आर्थिक तरतूद केली नसल्याने वर्षभरातील मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिला आहे. मानधनवाढीचे श्रेय लाटण्यासाठी १ एप्रिल २०१५ पासून मानधनवाढ देऊ, असे हास्यास्पद आश्वासन सरकार देत असल्याचे उटाणे यांनी सांगितले.परिणामी, आक्रमक झालेल्या संघटनांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आजसर्व संघटनांनी एकत्र येत कृती समितीची बैठक घेत तीव्र आंदोलनाची आखणी केली आहे. (प्रतिनिधी)