"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:40 IST2025-06-29T13:39:10+5:302025-06-29T13:40:05+5:30

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Hindi Compulsion: Maharashtra Navnirman Sena Slams CM Devendra Fadnavis | "मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा यांनी एकत्र येऊन पाच जुलै रोजी विराट मोर्चाची हाक दिली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याचपार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी फडणवीसांना मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी असे म्हटले आहे. 

पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांची सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णायाविरोधात राज्यातील अनेक पक्ष एकत्र आली आहेत. मात्र, याबाबत सरकारने अजूनही कोणाताही निर्णय घेतला नाही. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हिंदीवरून महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले.

अमेय खोपकर यांचा मराठी कलाकारांना आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मराठी कलाकारांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.  "ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी ५ जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया ५ जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे ही विनंती. कृतज्ञता म्हणून सर्वांनी ५ जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया  धन्यवाद", असे त्यांनी ट्वीट केले आहे.

Web Title: Hindi Compulsion: Maharashtra Navnirman Sena Slams CM Devendra Fadnavis