शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

हिमांशू रॉय यांची गोळी झाडून आत्महत्या, हाडांच्या कॅन्सरला कंटाळून जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:16 AM

धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली.

मुंबई : धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. तीन दशके महाराष्टÑ पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या अधिकाºयाने स्वत:चे जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कर्तबगार पोलीस अधिकारी गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.हिमांशू रॉय यांना काही काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. कर्करोगाचे निदान व नंतर उपचार सुरू झाल्यावरही ते कामावर येत होते. मात्र आजार बळावल्यानंतर ते दोन वर्षांपासून रजेवर होते. हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवित आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. आजार बळावल्याने त्यांचीप्रकृती खूपच खालावली होती. त्यांना उपचारासाठी परदेशातही जावे लागत होते.गोकूळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री त्यांच्यावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.घटनाक्रमदुपारी १२.४० वाजता - गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्यादुपारी १.४५ - बॉम्बे रुग्णालयात मृत घोषितदुपारी ३.४५ - शवविच्छेदनासाठी मृतदेह जीटी रुग्णालयातसायंकाळी ७.३० - मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यातरात्री १०.१५ - चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले...हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवितआहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.नरिमन पॉइंट येथील सुनीती या शासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रॉय हे पत्नी भावना यांच्यासोबत राहत होते. दुपारी १च्या सुमारास त्यांनी बेडरूममध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून तोंडात गोळी झाडून घेतली.रक्तबंबाळ अवस्थेत पत्नी आणित्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्यादोघा कर्मचाºयांनी त्यांना बॉम्बेरुग्णालयात दाखल केले. मात्रडॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :Himanshu Royहिमांशू रॉय