शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अडसूळांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 07:22 IST

सिटी बँक घोटाळा प्रकरण; अडसूळांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

ठळक मुद्देसिटी बँक घोटाळा प्रकरण; अडसूळांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई :  सिटी को-ऑप. बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले माजी खासदार व शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. 

ईडीने बजावलेले समन्स व दाखल केलेल्या गुन्ह्याला आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राजकीय वैमनस्यातून व केंद्र सरकारला पाठिंबा देण्यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीद्वारे राजकीय सूड उगवण्यात येत आहे. दिवाणी न्यायालयांना जे अधिकार असतात तेच अधिकार ईडीला तपासादरम्यान असतात. त्यांना न्यायालयाचाच दर्जा देण्यात आला आहे, असे अडसूळ यांनी याचिकेत म्हटले आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्या तक्रारीवरून ईडीने कारवाई केली आहे.  अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द केले. त्याचा सूड घेण्यासाठी राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार केली, असा युक्तिवाद ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे केला. बँक घोटाळ्याची पहिली तक्रार अडसूळ यांनीच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली होती, असे ॲड. चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले. 

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, समन्स बजावल्यानंतर  अडसूळ यांची वर्तणूक अयोग्य होती. त्याकडे डोळेझाक करू नये. जेव्हा ईडीचे अधिकारी अडसूळ यांना समन्स द्यायला गेले,  तेव्हा त्यांनी गोंधळ घातला आणि रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात गेले. ते ठीक असल्याचे रुग्णालयाने सांगितले. तेथून ते बाहेर पडले आणि अन्य रुग्णालयात दाखल झाले. त्यांचे हे वर्तन विचारात घ्यायला हवे.

‘माहिती देणाऱ्यालाच आरोपी करणे सामान्य’

  • न्यायालय म्हणाले की, आता या टप्प्यावर आम्ही याचिकाकर्त्याला (अडसूळ) कोणताही दिलासा देण्यास बांधील नाही.
  • माहिती देणाऱ्यालाच आरोपी करणे, हे सामान्य आहे. त्यामुळे आम्ही कोणतीही सवलत देणार नाही. 
  • सिटी को-ऑप. बँकेत झालेल्या ९८० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार-प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे.  सिटी बँकेने कर्जवाटपात केलेला घोटाळा व अन्य आर्थिक अनियमिततांसंदर्भात मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही गुन्हा नोंदविला.
टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय