शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नायक बदलला तरी पटकथा तीच!

By admin | Updated: February 24, 2015 02:29 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याबद्दल शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याबद्दल शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले आहे. नायक बदलला तरी पटकथा तीच असल्याची टीका करताना सिस्टीम ही उधळणाऱ्या घोड्यासारखी असते त्यावर घट्ट मांड ठोकून बसेल तोच राज्य चालवेल, अशा शब्दांत फडणवीस यांच्या क्षमतेवरच शिवसेनेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.या हत्ये प्रकरणात अद्याप आरोपी सापडत नसल्याबद्दल गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून लक्ष्य केले आहे. पोलिसांनी ताकद लावली तर पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात निश्चित यश मिळेल हे मुख्यमंत्र्यांचे विधान गमतीचे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळत आहेत. पानसरे यांचे खुनी शोधण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते गृहखात्याचे अपयश आहे.अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याआधी त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करा. आत्मचिंतन करा असे आम्ही सुचवणार नाही. कायदा व सुव्यवस्था हा विषय चिंतनाचा नसून कृतीचा आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. सरकार बदलले पण महाराष्ट्रात काय बदलले हा प्रश्न जनता आपल्याला विचारणार आहे, याची जाणीवही करून देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)