शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रिक्षावाल्याच्या मुलाने बनवली ड्रीम कार

By admin | Updated: October 20, 2016 14:57 IST

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. खारघर मधील रिक्षाचालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून एक ड्रीम कार तयार केली आहे.

वैभव गायकर, ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. २० - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. खारघर मधील रिक्षाचालकाच्या मुलाने इंटरनेटवर सर्फिंग करून एक ड्रीम कार तयार केली आहे . सर्व टाकाऊ सामानाचा वापर करून तयार केलेल्या या कार ला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे . कोणताही ऑटोमोबाईल क्षेत्राचा अनुभव नसताना प्रेम ठाकूर या मुलाने बनवलेली हि ड्रीम कार खारघर वासियांच्या चर्चेचा विषय बनला आहे . खारघर मधील सत्याग्रह महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या प्रेम ठाकूर च्या या कामगिरीची दाखल ऑटोमोबाईल क्षेत्रात घेतली गेली असून प्रेम ठाकूर च्या युट्युबवर अपलोड केलेला व्हिडीओ  चार दिवसात एकूण ८५ हजार नेटिझन्सने पाहिला आहे . 
   भंगार मध्ये पडलेल्या अॅसेंट गाडीच्या सामानाची जुळवाजुळव करून हि गाडी बनविण्यात आली आहे . याकरिता स्वतः प्रेम ने मुंबई कुर्ला , शिळफाटा याठिकाणाहून काही सामान गोळा करून हि गाडी तयार केली आहे . हि स्ट्रीट कार तयार करण्यासाठी प्रेम ला अडीच लाखाचा खर्च आला . वडील एकनाथ ठाकूर हे खारघर मध्ये रिक्षा चालवतात मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी देखील काहीच कुचराई न करता एक एक पैसा गोळा करून मुलाला मदत केली . हि कार तयार करण्यासाठी वेल्डिंग मशीन , ड्रील मशीन , कटर मशीन , हेड लाईट खरेदी करून संपूर्ण पार्ट प्रेम ने स्वतः जोडले . या कार ची विशेषतः म्हणजे या कार चा इंजीन मागे आहे . या कार मध्ये दुचाकीचे सस्पेंशन वापरण्यात आलेले आहेत . पाच गेअर ची हि कार असून सध्यातरी स्थानिक पातळीवर चालवू शकतो . या कारचा स्पीड शंभर च्या वर असून सध्यातरी हि गाडी केवळ १० किमी पर्यंत कव्हरेज देते. मला लहानपणापासून अशाप्रकारची गाडी बनविण्याची आवड होती. याकरिता अनेक वेळा मी युट्युबवर अशाप्रकारच्या गाडd/e तयार करतानाचा व्हीडीओ पाहिला होता. त्यातूनच मला हि कल्पना सुचली . मला ऑटोमोबाईल इंजिनिअर व्हायचे आहे अशी इच्छा यावेळी प्रेम ठाकूर याने व्यक्त केली.
 
 
मोबाईल दुरुस्ती , इन्व्हर्टर तयार करण्याचा वेगळा छंद -
प्रेम ठाकूर हा १९ वर्षीय तरुण आपल्या नवीन व आगळ्या वेगळ्या छंदानेसुद्धा परिसरात प्रसिद्ध आहे . लहान वयात अनेक मुलांना खेळायचा छंद असतो. मात्र प्रेमला मोबाईल दुरुस्ती , नवीन इन्व्हर्टर तयार करण्याचा छंद असल्याचे त्याचे वडील एकनाथ ठाकूर यांनी सांगितले . कोणत्याही प्रकारचे ऑटोमोबाईल क्षेत्राचा अनुभव नसताना प्रेम चे कार्य कौतुकास्पद आहे . स्वतःने तयार केलेलं दोन इन्व्हर्टर विकलेदेखील आहेत . 
 
आईच्या डोळ्यात मात्र कौतुकाचे अश्रू -
लहानपणापासून प्रेम हा अगदी बारीक व सडपातळ होता . त्याची वाढ योग्य रित्या होत नसल्याची मला चिंता सतावत असायची मात्र हळू हळू त्याच्या अंगी असलेले गुण आम्हालाही कळायला लागल्याने आम्हाला हि त्याचा अभिमान आहे . या क्षेत्रात तो भरपूर पुढे जावा व आपल्या देशाचे नाव जगभरात पोहचवावे अशी इच्छा प्रेम च्या आई संध्या ठाकूर यांनी व्यक्त केली . 
 
मेक इन इंडियाला साजेसे कार्य -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी मेक इन इंडिया, स्किल्ड इंडिया ही संकल्पना अस्तित्वात आणली . भारतीयामधील कलागुण व उत्पादनाना देशांतर्गत दाद मिळून त्यांना जगभरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांचा होता . प्रेम ठाकूर या १९ वर्षीय तरुणाचा मेक इन इंडियाला साजेसे असे कार्य आहे . त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी अशाप्रकाराचे कलागुणांनी परिपूर्ण असे घटक आहेत . त्याच्यापर्यत पोहचणे गरजेचे आहे . 
 
सत्याग्रह महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान -
खारघर मधील सत्याग्रह महाविद्यालयात प्रेम शिकत आहे . वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या आमच्या विद्यार्थ्याचा मला अभिमान आहे . अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जी . के . डोंगरगावकर यांनी दिली . त्याला काही मदत हवी असल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्याला नककीच सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.