पोलीस अहवालातील हेल्मेटसंबंधी नोंद अपघाती विम्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार
By Admin | Updated: January 10, 2017 00:04 IST2017-01-10T00:04:42+5:302017-01-10T00:04:42+5:30
दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्यास अपघाती विमा मंजुरीसाठी महत्त्वाच्या ठरणाºया पोलीस अहवालात यापुढे हेल्मेटबाबत स्पष्ट उल्लेख केला जाणार

पोलीस अहवालातील हेल्मेटसंबंधी नोंद अपघाती विम्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 10 - दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाल्यास अपघाती विमा मंजुरीसाठी महत्त्वाच्या ठरणाºया पोलीस अहवालात यापुढे हेल्मेटबाबत स्पष्ट उल्लेख केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दुचाकी चालविताना सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर कायद्याने बंधनकारक असतानाही बहुतांश नागरिक हेल्मेटचा वापर करण्यास टाळाटाळ क रतात. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक सुरक्षा सप्ताहला सोमवारपासून (दि.९) प्रारंभ करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सिंगल यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत हेल्मेटबाबतची नवीन माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले, अपघाती विमा मंजुरीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाºया पोलीस अहवालामध्ये यापुढे हेल्मेटचा विशेष उल्लेख राहणार आहे. त्यामुळे जर विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित पोलीस कर्मचाºयांकडून ‘हेल्मेट नाही’ असे स्पष्ट नोंद करण्यात येईल. या नोंदीमुळे संबंधित विमा कं पनी मयताच्या नातेवाइकाला अपघाती विम्याची रक्कमदेखील रद्द करू शकते. असे झाल्यास पोलीस त्याला कुठेही जबाबदार नसतील, असे सिंगल यांनी स्पष्ट केले. एकूणच ज्यांना आपली स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी असेल त्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.