शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 9:20 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस 

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २४ तासात तब्बल ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोकण गोव्यात वैभववाडी ७१०, मुंबई (कुलाबा) ३३०, उरण ३२०, रोहा ३००, भिरा २९०, पालघर २६०, माथेरान, श्रीवर्धन २४०, मंडणगड २३०, माणगाव, पनवेल, पेण २२०, मुरुड, सुधागड पाली २१०, म्हसाळा २००, महाड, पोलादपूर, ठाणे १८०, अलिबाग, दापोली १७०, पेडणे १५०, हर्णे १४०, बेलापूर, दोडामार्ग, कल्याण, वाडा १३०, चिपळूण, उल्हासनगर १२०, भिवंडी, कर्जत, खेड ११०, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात राधानगरी २३०, गगनबावडा २१०, महाबळेश्वर १९०, आजरा १८०, चांदगड १७०, लोणावळा १६०, वेल्हे १३०, कागल, पन्हाळा १२०, कोल्हापूर ११०, गडहिंग्लज, शाहूवाडी ९०, दिंडोरी ८०, भोर, पौड मुळशी, शिरपूर ७०, निफाड, पाटण ६० मिमी पाऊस पडला.याचवेळी घाटमाथ्यावरील ताम्हिणी ३३०, कोयना (नवजा) ३००, शिरगाव, डुंगरवाडी २८०, दावडी, अम्बोणे २७०, कोयना (पोफळी) १९०, लोणावळा (टाटा) १७०, खोपोली १४०, वळवण ११० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भात गोरेगाव १५०, आमगाव १२०, पारशिवनी ७०, गोंदिया, रामटेक, सौनेर, ६०, नागपूर, उमरेड ५० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात अंबड ३०, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

कोकणात आणखी ५ दिवस पाऊसयाबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले तरी कोकणात पुढील ५ दिवस पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण वगळता इतरत्र ९ ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील.त्यानंतर १०, ११ व १२ आॅगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.७ व ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ़़़़़़़़़़़

महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १३० मिमी पाऊसगुुरुवारी दिवसभरात मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला असून महाबळेश्वरमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (कुलाबा) ११, सांताक्रुझ २५, अलिबाग १४, जळगाव ११, पुणे ७, नाशिक ९ सातारा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.़़़़़़़़़़हवामान विभागाच्या अंदाजानुसार;  २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. वैभववाडी येथे अतिवृष्टीपेक्षा तिप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी चिन्नईमध्ये १ व २ डिसेंबर २०१५ मध्ये असाच विक्रमी पाऊस झाला होता़ त्यात जवळपास संपूर्ण चिन्नई शहर पाण्याखाली गेले होते़ मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी येथे १५ व १६ जून १९९५ मध्ये ४८ तासात तब्बल २ हजार ४९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी