उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:39 IST2025-07-01T18:38:36+5:302025-07-01T18:39:55+5:30

Deputy CM Eknath Shinde News: मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत शक्य ती सारी मदत पोहोचवण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

heavy rains in uttarakhand marathi tourists stranded deputy cm eknath shinde rushed to help and communicate over phone | उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद

Deputy CM Eknath Shinde News:उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे. 

देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटी अदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. अशात उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून सुमारे १५० मराठी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवली जाईल असे सांगून त्यांना धीर दिला. तसेच कोणतीही मदत लागल्यास आपल्याला संपर्क करावा असेही सांगितले.  

यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या पर्यटकांना अन्न धान्य आणि आवश्यक ती मदत तातडीने पोहचवण्याची विनंती केली.  याबाबत उत्तराखंड सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर रस्ता पूर्ववत करून अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्यात येईल असे सांगितले. सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उत्तराखंड सरकारकडून सुरू असून शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहचून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Web Title: heavy rains in uttarakhand marathi tourists stranded deputy cm eknath shinde rushed to help and communicate over phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.