heavy raining in next four days but the agriculture department warns the farmers | उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा
उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा

मुंबई : विलंबाने का होईना मान्सूनचे आगमन तळकोकणात झालेले असले तरीही शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसंबंधी इशारा दिला आहे. 


मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यानंतर आटवडाभर पाऊस होणार नसल्याने अंदाज घेऊनच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. 


जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि 26 जूननंतर पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वादळी पावसावेळी लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असेही आवाहन केले आहे.
 

Web Title: heavy raining in next four days but the agriculture department warns the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.