शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 14:41 IST

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast ( Marathi News ) : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच प्रादेशिक हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला असून राजधानी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. "पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे," अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसंच मुंबई शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सिअस आणि २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कुठे किती बरसला?

सोलापूर जिल्ह्यातील  मोहोळ तालुक्यात नरखेड आणि बार्शी तालुक्यात पडलेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामत: नरखेड परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पिकांमध्ये, शेतात सर्वत्र पाणी साठून तळ्याचे रूप आले आहे.

सातारा जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत.  जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडला आहे.

लातूर जिल्ह्यात  मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 लोणावळा शहरामध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट करत जोरदार पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत झाला. या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाज