शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत! अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:53 IST

सिंधुदुर्गमध्ये झाली अतिवृष्टी; मराठवाडा, विदर्भातही कोसळल्या दमदार सरी

पुणे : राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी कोकणातून नगर, मराठवाड्यातील काही भागांतून विदर्भातील गोंदियापर्यंत मजल मारली आहे. येत्या २४ तासांत तो पुणे, मुंबईसह राज्याचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्यता असून, कोकणासह मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत लाभणार आहे. शनिवारी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २२५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. 

संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे, दुष्काळी मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यात पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही काही ठिकाणी सरी कोसळल्या.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबरोबरच देशातील छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशा व प. बंगालचा उर्वरित भाग, तसेच झारखंडचा बहुतांश भाग आणि बिहारच्या काही भाग व्यापला आहे. येत्या २४ तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात १४ जून रोजी, तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १६ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाणी सोडले
शुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

14 जून रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे़

15, 16 जून रोजी कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधारेची शक्यता आहे. १६ जून रोजी पुणे जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला.

मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल : मान्सून रविवारी मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भागांत तसेच दक्षिण गुजरातमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर व उपनगरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. रात्री मात्र पावसाच्या सरी अनेक भागांत बरसल्या.

टॅग्स :Rainपाऊस