उकाडा वाढणार! मुंबई, ठाणे आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा

By सचिन लुंगसे | Updated: March 7, 2025 20:18 IST2025-03-07T20:15:39+5:302025-03-07T20:18:13+5:30

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले.

Heatwave warning issued for Mumbai, Thane and Raigad | उकाडा वाढणार! मुंबई, ठाणे आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा

उकाडा वाढणार! मुंबई, ठाणे आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई - मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी ३५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, बुधवारपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. तर हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले, की पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. १२ मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो.

उष्णतेची लाट म्हणजे ?
कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान ३७ अंशापेक्षा अधिक नोंदविले जाईल. ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा ४ अंशाने जास्त असेल.

मागदर्शक तत्वे
- दुपारच्यावेळी बाहेरचा संपर्क टाळा
- भरपूर पाणी प्या
- सुती आणि सैल कपडे घाला
- जड / तेलकट पदार्थ टाळा

 कुठे किती पारा
अलिबाग ३६.६
छ. संभाजी नगर ३६.२
बीड ३६
जळगाव ३६.३
कोल्हापूर ३६.६
मुंबई ३५.८
पालघर ३६.३
रत्नागिरी ३७.३
सांगली ३७.२
सातारा ३६.७
सोलापूर ३८.८
ठाणे ३६.६

Web Title: Heatwave warning issued for Mumbai, Thane and Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.