शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नफेखोरीच्या नादात आरोग्याची ऐशीतैशी

By admin | Updated: December 15, 2014 03:45 IST

राज्यातील ३५ शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभाग अत्याधुनिक करण्याच्या निर्णयाने सर्वसामान्य रुग्णांच्या आशा पालवल्या होत्या

यदु जोशी, नागपूरराज्यातील ३५ शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभाग अत्याधुनिक करण्याच्या निर्णयाने सर्वसामान्य रुग्णांच्या आशा पालवल्या होत्या. त्यासाठी दोन बड्या कंपन्यांना २६४ कोटी रुपयांचे कंत्राट आरोग्य विभागाने सरकारी व खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) दिले खरे, पण आता या कंपन्यांनी हे काम आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे कारण देत हात वर केल्याने किफायतशीर दरांतील सेवांना सर्वसामान्य वंचित राहिले आहेत.या कंपन्यांनी हे काम अन्य बड्या कंपन्यांकडे वळवून अधिक आर्थिक लाभ मिळविण्याच्या हालचाली सुरू असल्याने योजनेच्या अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याचे म्हटले जाते. दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठीही योजना होती. सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, मॅमोग्राफी मशीन, ओझोन थेरपी, थ्रीडी कलर डॉप्लर अशा आधुनिकमशीन्स या विभागांमध्ये आणायच्या आणि त्याचा लाभ रुग्णांना द्यायचा, अशी ही योजना होती. संपूर्ण राज्यात एका वर्षात ३ कोटी रुग्णांंना या योजनेचा फायदा झाला असता, पण योजना अमलातच आलीच नाही.विदर्भातील १३ (अमरावती- २, बुलडाणा - २, अकोला, नागपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा) आणि मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील २२ इस्पितळांमध्ये हे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार होते. विदर्भासाठीचे कंत्राट फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. कंपनीने पुढील १० वर्षांत हे मशीन्स चालवावेत आणि त्यासाठी १०४ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी. कंपनी १३ इस्पितळांसाठी सरकारला वार्षिक ५ लाख रुपये नाममात्र शुल्क द्यायचे, बीपीएलचे रुग्ण, आजी-माजी आमदार, खासदार, शासकीय कर्मचाऱ्यांसह १९ प्रकारच्या कॅटेगिरींना मोफत उपचार द्यावेत, राजीव गांधी जीवनदायी योजनेतील रुग्णांना केंद्रीय आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) निश्चित केलेल्या दरानुसार लाभ द्यावा आणि अन्य कॅटेगिरींकडून (एपीएलसह) बाजार दराने सुविधा उपलब्ध करावी, अशा अटी व शर्ती निविदेत होत्या.राज्याच्या अन्य भागांतील २२ इस्पितळांमध्ये रेडिआॅलॉजी विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्याचे कंत्राट जवळपास याच पद्धतीने विप्रो-जीई या कंपनीला देण्यात आले. त्यासाठी विप्रो-जीईला १६४ कोटी रुपयांची गुंतवणूक करावयाची होती. संपूर्ण राज्यात केवळ पुणे जिल्ह्णांतील औंध येथील रेडिआॅलॉजी विभागाचे अत्याधुनिकीकरण होऊशकले. तेही कंपनीने अन्य एका कंपनीला विभाग चालवायला दिला. दोन्ही कंपन्या आपले कंत्राट अन्य एखाद्या बड्या हॉस्पिटलकडे वा आरोग्य क्षेत्रातील कंपनीकडे वळविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे म्हटले जाते. विप्रो-जीईने आरोग्य विभागाशी करार तरी केला पण फिलिप्स कंपनीने अद्याप करारदेखील केलेला नाही. ही योजना बनविताना योग्य तांत्रिक सल्लागारांचा आरोग्य विभागाकडे अभाव असल्याने योजनेचा बोजवारा उडाला, असेही बोलले जाते. कंत्राटाची अंमलबजावणी करण्यास विलंब लावणाऱ्या दोन्ही कंपन्या बड्या असल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे धाडस आरोग्य विभाग दाखवू शकलेला नाही आणि अजून केवळ त्या बाबत केवळ इशाराच दिला जात आहे.