शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:17 IST

Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले.

Rahul Gandhi Sangli Speech PM Modi : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जो चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. स्व. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले, "आज आपण कदमजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. तिथे असताना मी विचार करत होतो की, कदमजींनी ६० वर्षे आपल्यासोबत काम केले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी ६० वर्षात कधीही माफी मागितली नाही. का मागितली नाही, कारण गरज पडली नाही. हेच सत्य आहे. माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. 

मोदींनी माफी कोणत्या कारणासाठी मागितली? राहुल गांधींचा सवाल

पुढे बोलताना ते म्हणाले  की, "काही दिवसांपूर्वी इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. मी वृत्तपत्रात वाचले की, पंतप्रधान म्हणाले, मी शिवाजी महाराजांची माफी मागतो. मला हे समजून घ्यायचे आहे की, पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली?"

"अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण असू शकते की, हा जो पुतळा होता, त्याचे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिले होते. कदाचित पंतप्रधानांना म्हणायचे आहे की, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला द्यायला नको होते. मी हे कंत्राट गुणवत्तेच्या आधारावर द्यायला पाहिजे होते", असे म्हणत राहुल गांधी मोदींना लक्ष्य केले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल -राहुल गांधी

राहुल गांधी पुढे म्हणाले, "दुसरी चूक असू शकते की, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला. चोरी झाली. कदाचित पंतप्रधान यासाठी माफी मागत आहेत. मी ज्याला कंत्राट दिले, त्याने भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राच्या लोकांसोबत चोरी केली. हे कारण असू शकते. तिसरे कारण असू शकते की, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. त्यांची आठवण म्हणून तुम्ही पुतळा बनवला आणि तो पुतळा उभा राहिली याकडे तुम्ही लक्ष दिले नाही."

"मी खात्री देतो की, कदमजींचा हा पुतळा बनला आहे ना, तुम्ही इथे पन्नास, साठ, सत्तर वर्षांनंतर येऊ बघा. तो तुम्हाला इथे दिसेल. शिवाजी महाराजांचा पुतळा बनतो आणि काही दिवसांत भ्रष्टाचार, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट देण्याच्या कारणामुळे तो पुतळा पडतो. शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. जर माफी मागायची असेल, तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची मागायला हवी", असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sangliसांगली