शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:52 IST

पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला आहे.

ठळक मुद्देइंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्वसलग ३ वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून  येण्याचा विक्रम

इंदापूर :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  बुधवारी (दि. ११) मुंबई येथे दुपारी ३ वाजता पाटील यांचा भाजप प्रवेश होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना यानिमित्ताने पूर्ण विराम मिळाला आहे.या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे.  इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग ३ वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून  येण्याचा विक्रम देखील पाटील यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्रीमनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या  युती शासनात ५ वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग १४ वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी  एकूण ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेआहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्या सुप्त संघर्षाला  धार चढणार असून तालुक्यातील राजकिय परिस्थितीलाही वेगळे वळण मिळणार आहे.

 

टॅग्स :Indapurइंदापूरindapur-acइंदापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस