"आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा"; मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:32 PM2021-03-12T13:32:07+5:302021-03-12T13:35:14+5:30

बंजारा समाजाच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

haribhau rathod wrote letter to cm uddhav thackeray for demanding forest ministry | "आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा"; मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

"आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा"; मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देवनमंत्रीपदासाठी मोठी चढाओढ सुरूवनमंत्रिपदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉबिंगवनमंत्रीपद द्या, या मागणीसाठी थेट उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच बंजारा समाजाच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे. (haribhau rathod wrote letter to cm uddhav thackeray for demanding forest ministry)

बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वनमंत्री करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे. 

MPSC Exam: २१ ला परीक्षा न झाल्यास वर्षासमोर उपोषण; गोपीचंद पडळकरांचा इशारा

काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद

आता वनमंत्रीपद मला द्यावे. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते, असेही राठोड यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्रानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकास आघाडीत वनमंत्रिपद मिळवण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, त्याच मंत्र्याकडे जाईल, असे सांगितले जात आहे. 

वनमंत्रीपदासाठी मोठी चढाओढ

राजकीय वर्तुळातील चर्चा आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनमंत्रीपदासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचे समजते. तर, मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का, याची चाचपणी करत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात असल्याने उद्धव ठाकरे यांना अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेर मंजूर करावा लागला होता. मंत्रिपद टिकावे, यासाठी संजय राठोड यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करत दबावतंत्राचा वापरही केला होता, असे सांगितले जात आहे. 

Web Title: haribhau rathod wrote letter to cm uddhav thackeray for demanding forest ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.