शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पुनर्वसन लटकले

By admin | Updated: January 30, 2015 03:58 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे.

गणेश वासनिक, अमरावतीमेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे. असे असले तरी २१ गावांचे पुनर्वसन निधीअभावी रखडल्याचे उघडकीस आले आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी ३७५ कोटींची गरज आहे. व्याघ्र प्रकल्पातून गावांच्या पुनर्वसनाशिवाय वाघांचे संगोपन शक्य नाही, हेदेखील तितकेच खरे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन, निधीचे नियोजन, कृती आराखडा, योजनांची अंमलबजावणी करण्यात अग्रेसर आहे. मात्र, वाघांच्या संरक्षणासाठी पोषक वातावरण असलेल्या मेळघाटात गावांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. यापूर्वी १३ गावांचे पुनर्वसन झाले असून, २१ गावांचे निधीअभावी पुनर्वसन रखडले आहे़ यामुळे या गावांच्या आश्रयाने काही टोळ्या वाघांच्या शिकरीचा डाव रचत असल्याची माहिती आहे. त्यामुळे २१ गावांच्या पुनर्वसनाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या गावांतील रहिवाशांना प्रत्येकी १० लाख रुपये मोबदला देण्याचे शासनाचे धोरण आहे. २१ गावांचे पुनर्वसन करताना ३ हजार ७२१ रहिवासी विस्थापित होत असून, ३७१ कोटी २१ लाख रुपयांची गरज भासणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे संगोपन आणि संरक्षणात अडथळा ठरणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक निधीकरिता अहवाल पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले़