शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सावधान! वेणी कापणारी गॅंग आता मुंबईतही, तीन महिलांचे केस कापले, अफवांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 8:49 PM

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ वेणी कापणारी गँग मुंबईतही आल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ वेणी कापणारी गँग मुंबईतही आल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.

मुंबई, दि. 17 -  उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ वेणी कापणारी गँग मुंबईतही आल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असले तरी अफवांना मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (39) मुलीसोबत राहतात. 12 आॅगस्ट रोजी मध्यरात्री २च्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेनंतर अशीच आणखी एक घटना 15 आॅगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. डोकं दुखत असल्याने औषध घेऊन रात्री घराबाहेर खाट टाकून झोपल्या होत्या. रात्री अडीचच्या सुमारास डोकं जड झाल्यासारखे वाटल्याने त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.अंधश्रद्धा किंवा विकृती-अंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत ख-या आहेत याची शहानिशा सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय ?दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये घडताना दिसून येत आहे. येथील महिलांनी असा दावा केला आहे की, अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर. उत्तरप्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम...काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेण्या घालणंच दिले सोडून...केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेण्या घालणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.

टॅग्स :Crimeगुन्हा