कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:31 AM2021-12-27T06:31:45+5:302021-12-27T06:32:05+5:30

२८ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश व मराठवाड्यातही अवकाळीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Hail crisis in the state after Corona, rain warning for 'this' districts in maharashtra | कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

Next

मुंबई : पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पूर्व अफगाणिस्तान व लगतच्या पाकिस्तानवर आहे. तेथून राजस्थानच्या हवेतील सिस्टीममधून विदर्भापर्यंत ते कार्यरत राहील. त्याचा प्रभाव म्हणून २८ ते २९ डिसेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. २८ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश व मराठवाड्यातही अवकाळीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

- विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.७ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे.

येथे पावसाची शक्यता
२८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त धुळे, नाशिक, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 - कृष्णानंद होसाळीकर, 
वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग
 

Web Title: Hail crisis in the state after Corona, rain warning for 'this' districts in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस