धुळे जिल्ह्यात पुन्हा गारपीट

By Admin | Updated: March 30, 2015 02:12 IST2015-03-30T02:12:18+5:302015-03-30T02:12:18+5:30

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शनिवारी पुन्हा धुळे जिल्ह्यातील काही भागांत गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़

Hail again in Dhule district | धुळे जिल्ह्यात पुन्हा गारपीट

धुळे जिल्ह्यात पुन्हा गारपीट

धुळे / शहादा (जि. नंदुरबार) : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शनिवारी पुन्हा धुळे जिल्ह्यातील काही भागांत गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़
धुळ जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस व गारपीट झाली. साक्री तालुक्यातील बासर येथे वीज कोसळून बैल ठार झाला़ माळमाथा परिसरात आलेल्या वादळामुळे तालुक्यातील वाजदरे येथील अनेक घरांवरील पत्रे अक्षरश: उडून गेली. अनेकांचे संसार उघड्यावर आले.
गेल्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शहादा शहरात शनिवारी सायंकाळी पुनश्च अवकाळी पाऊस झाला. २० मिनिटे झालेल्या या पावसाने सर्वांची धावपळ उडाली.
पुणे जिल्ह्यातील चाकण व परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. खालुंब्रे, निघोजे परिसरात जोरदार गारपीट झाली़ गारपिटीमुळे आंब्याच्या कैऱ्यांचे नुकसान झाले. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Hail again in Dhule district