Gulabrao Patil On Raj Thackeray: राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही, गुलाबराव पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:14 PM2021-09-30T15:14:30+5:302021-09-30T15:21:42+5:30

Gulabrao Patil On Raj Thackeray: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Gulabrao patil taunt raj thackeray over demand to Declare a wet drought in Maharashtra | Gulabrao Patil On Raj Thackeray: राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही, गुलाबराव पाटील यांचा टोला

Gulabrao Patil On Raj Thackeray: राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही, गुलाबराव पाटील यांचा टोला

Next

Gulabrao Patil On Raj Thackeray: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासोबतच प्रत्येक नुकसानग्रस्ताला ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. (Gulabrao patil taunt raj thackeray over demand to Declare a wet drought in Maharashtra)

"राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं असं होत नाही. राजकारण करु नका. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल", असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मागणीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

प्रत्येकाचा पिकपेरा वेगवेगळा असल्यानं सरसकट मदत करता येत ननाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करुनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. यातही सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. ओला दुष्काळ म्हणूनच सरकारनं अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये संपूर्ण माहिती आल्यावर नक्कीच जनतेच्या हिताचाच निर्णय घेता येईल, असंही ते म्हणाले. 

राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे. पंरतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Web Title: Gulabrao patil taunt raj thackeray over demand to Declare a wet drought in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app