Gulabrao Patil: नारायण राणेंनाही कुणी तरी 'बॉय' असेलच; गुलाबराव पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:59 IST2022-02-17T19:59:20+5:302022-02-17T19:59:40+5:30
Gulabrao Patil on Narayan Rane: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी राऊत यांना फैलावर घेतले होते.

Gulabrao Patil: नारायण राणेंनाही कुणी तरी 'बॉय' असेलच; गुलाबराव पाटलांचा टोला
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी राऊत यांना फैलावर घेतले होते. यावर शिवसेनेचे फायरब्रँड मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेना टोला लगावला आहे.
राजकारणात प्रत्येकाला 'बॉय' असतोच, नारायण राणे यांना देखील कुणी तरी बॉय असेलच फक्त त्यांनी त्याचे नाव सांगावे, असा टोला लगावला आहे. तसेच किरीट सोमय्या हे सुशिक्षीत बेरोजगार राजकारणी असल्याची टीका देखील केली.
शिवज्योत रॅलीच्या माध्यमातून शिवजयंतीचा उत्साह सुरु करण्यात आला. सार्वजनीक शिवजयंती समितीतर्फे आज महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून आजपासून शिवज्योत रॅली काढून शिवजयंती महोत्सव सुरू झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून शिवज्योत रॅली सुरू करण्यात आली.