दोषी पोलिसांची बदली होणार

By Admin | Updated: May 3, 2015 00:45 IST2015-05-03T00:45:40+5:302015-05-03T00:45:40+5:30

अक्षय्यतृतीयेच्या रात्री कापशी गावात पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी दोषी पोलिसांवर कारवाई

The guilty police will be transferred | दोषी पोलिसांची बदली होणार

दोषी पोलिसांची बदली होणार

अकोला : अक्षय्यतृतीयेच्या रात्री कापशी गावात पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी दोषी पोलिसांवर कारवाई आदेश दिले आहेत. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर दोन
दिवसांत बदलीची कारवाई होणार असून बदली आदेशावर पोलीस महासंचालकांची सही झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
अक्षय्यतृतीयेच्या रात्री अकोला तालुक्यातील कापशी गावात पोलिसांनी हैदोस घातला होता. प्रकरणाचा अहवाल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, पोलिसांनी अत्याचार केल्याबाबत मुख्यमंत्री सहमत असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The guilty police will be transferred