पुणे : यंदाच्या वर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. येत्या ६ डिसेंबरपासून ते यु-टयुबवरील बालभारती चॅनलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर दहावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही यंदापासून मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंमपटट्ी करून पाठ केलेले उत्तरपत्रिकांमध्ये उतरविण्याऐवजी त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवावीत यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत. येत्या ६ डिसेंबरपासून ते यु-टयुबवरील बालभारतीच्या चॅनलवर उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिली आहे.बालभारतीच्या व्हिडीओमध्ये सराव कृतिपत्रिकांमधील उत्तरांच्या संदर्भाने तज्ज्ञांचे मत व मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. त्यामुळे कृतिपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांच्या नेमक्या कुठे चुका होतात, त्या टाळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांना या व्हिडीओव्दारे मिळणार आहे.दहावीच्या सर्व विषयांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. ६ डिसेंबर रोजी सर्व प्रथम भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील. ७ डिसेंबर रोजी व्दितीय भाषा विषयांचे तर ८ डिसेंबर रोजी तृतीय भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील. ९ डिसेंबर रोजी विज्ञान भाग १, १० डिसेंबरर रोजी विज्ञान भाग २, ११ डिसेंबर रोजी गणित भाग १, १२ डिसेंबर रोजी गणित भाग २, १३ डिसेंबर रोजी इतिहास आणि राज्यशास्त्र तर १४ डिसेंबर रोजी भुगोल या विषयांचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.......................कृतिपत्रिकांबाबतच्या शंकांचे होईल निरसनदहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया कृतिपत्रिकांचे यंदा पहिलेच वर्ष असल्याने याबाबत अनेक शंका विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मनात आहेत. कृतिपत्रिकांचे सरावसंच २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध झाले आहेत, त्यामध्ये भाषा विषयांच्या कृतिपत्रिका सोडविताना वेळ पुरत नसल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. या पार्श्वभुमीवर यु-टयुबवर उपलब्ध करून देण्यात येणाºया तज्ज्ञांच्या व्हिडीओमुळे त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.विषयनिहाय व्हिडीओ उपलब्ध होण्याचे वेळापत्रकविषय दिनांकप्रथम भाषा ६ डिसेंबर २०१८व्दितीय भाषा ७ डिसेंबर २०१८तृतीय भाषा ८ डिसेंबर २०१८विज्ञान भाग १ ९ डिसेंबर २०१८विज्ञान भाग २ १० डिसेंबर २०१८गणित भाग १ ११ डिसेंबर २०१८गणित भाग २ १२ डिसेंबर २०१८इतिहास १३ डिसेंबर २०१८भूगोल १४ डिसेंबर २०१८
दहावीच्या विद्यार्थ्यांना यु-टयुबवरून कृतिपत्रिकांबाबत मार्गदर्शन : बालभारतीचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:28 IST
दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर दहावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही यंदापासून मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांना यु-टयुबवरून कृतिपत्रिकांबाबत मार्गदर्शन : बालभारतीचा उपक्रम
ठळक मुद्दे६ डिसेंबर पासून होणार उपलब्ध बालभारतीच्या व्हिडीओमध्ये सराव कृतिपत्रिकांमधील उत्तरांच्या संदर्भाने मार्गदर्शन उपलब्ध