शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या कारची धडक; दुचाकीस्वार गंभीर

By admin | Updated: March 30, 2015 00:23 IST

कुडाळात जोरदार चर्चा : केसरकरांकडून चौकशीही नाही

कुडाळ : पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय कारने कर्ली येथील मच्छिंद्रनाथ तुळसकर या मोटारसायकलस्वाराला बिबवणे येथे जोरदार धडक देत उडविले. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा पाय निकामी होऊन गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारांसाठी गोवा येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपघातातील जखमी व चालक यांची साधी चौकशीही केली नसल्याची घटनास्थळी जोरदार चर्चा होती. पालकमंत्री दीपक केसरकर यांना आणण्यासाठी ओरोसहून शासकीय गाडी घेऊन फिलिप्स डुमिंग सोज हा रविवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडी येथे जात होता. गाडी कुडाळ तालुक्यातील बिबवणे-तेर्सेबांबर्डे येथील हॉटेल गुरुप्रसाद समोरील मुंबई-गोवा महामार्गावर आली असता भरधाव वेगाने जाणाऱ्या या गाडीने सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारसायकलस्वार व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट लांब असलेल्या झाडीत जाऊन पडली. यामध्ये मोटारसायकलस्वार मच्छिंद्रनाथ तुळसकर हे गंभीर जखमी झाले. कारची धडक त्यांच्या पायावर बसल्याने त्यांचा पायही निकामी होण्याची शक्यता आहे. त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी गोवा येथे हलविण्यात आले. अपघाताबाबत कारचालक सोज याने तक्रार दिली असून रस्त्याकडेच्या कलिंगडच्या दुकानाकडून डाव्या बाजूला मोटार सायकल वळविताना हा अपघात झाल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, या अपघाताची माहिती पालकमंत्र्यांना मिळाली. परंतु अपघातग्रस्त मोटारसायकलस्वार व कारचालक यांची चौकशी न केल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, अपघातस्थळी कुडाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, सचिन पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. (प्रतिनिधी)