सोलापूर : महापालिकेत आयोजित पक्षबैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिलीप कोल्हे यांनी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांना श्रीमुखात भडकावल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी आहे. या पार्श्वभूमीवर व्यूहरचना ठरविण्यासाठी उपमहापौरांनी राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. गटनेते कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच डोंगरे यांना लक्ष्य केले. यावरून डोंगरे व त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी डोंगरे यांनी कोल्हे यांचा एकेरीत उल्लेख केला. यामुळे संतापलेल्या कोल्हे यांनी डोंगरे यांच्या श्रीमुखात भडकावली. तर, डोंगरे यांनीही कोल्हे यांच्या पोटात गुद्दे घातले. नंतर डोंगरे यांना ‘चुका करतोस आणि नेत्यांना सांगतोस काय,’ असे म्हणते कोल्हे यांनी कपडे फाडून मारले. (प्रतिनिधी)
गटनेत्याने उपमहापौरांच्या श्रीमुखात भडकावली; सोलापुरात हाणामारी
By admin | Updated: December 19, 2014 04:48 IST
महापालिकेत आयोजित पक्षबैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिलीप कोल्हे यांनी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांना श्रीमुखात भडकावल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
गटनेत्याने उपमहापौरांच्या श्रीमुखात भडकावली; सोलापुरात हाणामारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}