शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस् अ‍ॅपवरील ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

By admin | Updated: June 18, 2014 11:14 IST

फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे

औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे; पण जो अशा ग्रुपचा म्होरक्या आहे, त्याला भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांची पुसटशीही कल्पना नाही. कायद्याचे तसूभरही ज्ञान नाही. अशा एका ग्रुप अ‍ॅडमिनवर आज पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.शेख कलीम शेख सिराजोद्दीन (२२), असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् अ‍ॅपवरील एका ग्रुप अ‍ॅडमिनचे नाव आहे. शेख कलीम एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. शेख सिराजोद्दीन यांच्या नावाचे कलीमकडे सीम कार्ड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपचा एक ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये त्याच्या फेसबुक अकाऊंटमधील मित्रांना परस्पर सदस्य बनवले. परवा रविवारी रात्री दिनेश अशोक बियाणी (रा. चुनाभट्टी, गांधीनगर) हा घराबाहेर अमन राऊत या आपल्या मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी अमनच्या ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून मेसेज आला. त्यात एका देवाचे विडंबनात्मक चित्र होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते आपल्या काही मित्रांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरील ग्रुप अ‍ॅडमिनचा शोध घेतला असता तो जोगेश्वरी येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शेख कलीम यास अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता व्हॉटस् अ‍ॅपवर ते चित्र राजस्थान येथील रोमिओ आसेफ या तरुणाने ग्रुपमध्ये टाकल्याचे त्याने सांगितले. रोमिओ हा शेख कलीमचा फेसबुक मित्र आहे. कलीम त्याला प्रत्यक्ष कधी भेटलाही नाही व त्याच्याशी कधी बोललादेखील नाही, हे विशेष!