राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर, अनिल परब यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:38 PM2021-04-20T21:38:45+5:302021-04-20T21:39:40+5:30

प्रत्येक परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रूपयांचं देण्यात येणार. ऑनलाइन पद्धतीनं रक्कम रिक्षा चालकांच्या खात्यात जमा केली जाणार.

grant announced for more than 7 lakh rickshaw license holders in the maharashtra coronavirus lockdown | राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर, अनिल परब यांची माहिती

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर, अनिल परब यांची माहिती

Next
ठळक मुद्देप्रत्येक परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रूपयांचं देण्यात येणार.ऑनलाइन पद्धतीनं रक्कम रिक्षा चालकांच्या खात्यात जमा केली जाणार.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध घातले आहे. राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी हेदेखील उपस्थित होते. 

राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी १ हजार ५०० रूपयांप्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.  याकरिता परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाइन नोंद करावी लागेल आणि याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

सदर प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता रिक्षा परवाना धारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. "सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडून घ्यावे, जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम  वेळेवर अदा करता येईल." असे आवाहन अनिल परब यांनी केले.

Web Title: grant announced for more than 7 lakh rickshaw license holders in the maharashtra coronavirus lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.