महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 08:13 IST2024-10-17T08:12:50+5:302024-10-17T08:13:46+5:30

पटोले म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोनाचा सामना करावा लागला, त्या संकटातही मविआ सरकारने केलेल्या कामाची दखल साऱ्या जगाने घेतली.

Grand coalition government's claims of development are false;says nana patole | महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका

महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका

मुंबई : महायुती सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एकवर होता, पण महायुतीच्या काळात अधोगती झाली आहे. गुजरातच्या हस्तकांनी पुरती वाट लावली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोनाचा सामना करावा लागला, त्या संकटातही मविआ सरकारने केलेल्या कामाची दखल साऱ्या जगाने घेतली. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महायुतीला पुन्हा सत्ता देणार नाही.  

Web Title: Grand coalition government's claims of development are false;says nana patole