शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शिक्षक भरतीच्या विलंबामुळे पात्रताधारकांच्या नैराश्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:28 IST

राज्यात शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल या आशेवर डि.एड, बी.एड. पात्रताधारक आलेला दिवस ढकलत आहेत.

ठळक मुद्देघोषणा विरल्या हवेतच : सहनशिलतेचाही होऊ लागला अंतराज्यात ७ ते ८ लाख डि.एड, बी.एड. पात्रताधारक येत्या २६ नोव्हेंबर पासून पात्रताधारकांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार डि.एड, बी.एड पात्रताधारक अनेक मुला-मुलींचे करिअरच धोक्यात

पुणे : राज्यात मागील ८ वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. या कालावधीमध्ये हजारो डि.एड. व बी.एड. पदवीधारक पदव्या घेऊन बाहेर पडले, मात्र शासन केवळ पात्रता परीक्षा, अभियोग्यता चाचणी अशा परीक्षा घेण्यापलीकडे काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे पात्रताधारकांमध्ये मोठयाप्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली असल्याचे डि.एड., बी.एड. पात्रताधारकांनी सांगितले.  प्राध्यापक, प्राचार्यांच्या भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे, त्यापाठोपाठ आता शिक्षक भरतीवरीलही स्थगिती उठेल अशी अपेक्षा पात्रताधारकांना वाटत होती, मात्र ती फोल ठरली आहे. राज्यात ७ ते ८ लाख डि.एड, बी.एड. पात्रताधारक आहेत. शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल या आशेवर ते आलेला दिवस ढकलत आहेत. मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती करण्यासाठी दिलेली कुठलीच डेडलाइन पाळलेली नाही. जून २०१८ पर्यंत शिक्षक भरतीला सुरूवात होईल असा शब्द त्यांनी दिला होता, मात्र त्यांना तो पाळता आला नाही. राज्यात शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा किती आहेत, त्यापैकी किती जागा भरल्या जाणार आदींची कुठलीच माहिती पात्रताधारकांना मिळत नसल्याचे डि.एड, बी.एड. पात्रताधारक संघटनेच्या उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे यांनी सांगितले. संघटनेच्यावतीने सातत्याने शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. जिल्हास्तराव तसेच शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर अनेकदा धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाला जाग येत नसल्याने पुन्हा एकदा येत्या २६ नोव्हेंबर पासून पात्रताधारकांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.  डि.एड, बी.एड पात्रताधारक अनेक मुला-मुलींचे करिअरच धोक्यात आले आहे, त्यामुळे शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शिक्षक भरती तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ..................परीक्षांवर परीक्षा मात्र हाती काहीच नाहीराज्य शासनाने २०१३ पासून ६  वेळा पात्रता परीक्षा घेतल्या. त्याचबरोबर गुणवत्तेच्या आधारावर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्यासाठी अभियोग्यता चाचणीही घेतली. त्याची गुणवत्ता यादी जाहीर केली. पवित्र पोर्टलवर उमेदवारांची नोंदणीही झाली. मात्र शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य धोक्यातडि.एड., बी.एड केल्यानंतर पूर्वी शाळांमध्ये सहज नोकरी मिळून जायची. त्यामुळे दहावी-बारावीमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे बहुतांश विद्यार्थी डि.एड, बी.एडकडे वळायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे या पदव्यांना काहीच महत्त्व उरलेले नाही. नवी पिढी शिक्षकी पेशाला सरळ नकार देऊ लागली आहे, त्यामुळे यापुढील काळात गुणवंत शिक्षकांचा मोठा वानवा निर्माण होणार असून शिक्षण व्यवस्थेचे भवितव्यच धोक्यात येईल.-महानंदा कोत्तावर, डि.एड पात्रताधारक 

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणVinod Tawdeविनोद तावडे