Govt's gift to 1 lakh employees of ST | एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट 

एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट 

मुंबई  - राज्य एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी भेट दिली आहे.  एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे  2,500 आणि 5,000 रुपये इतकी रक्कम भेट म्हणून देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. 

गेली 4 वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये अग्रिम देण्यात आले आहेत. आता  सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 2,500 रुपये आणि 5,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यात आचारसंहिता सुरू असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.  निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.  

यासंदर्भात एस.टी.च्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी दिवाकर रावते यांना यांना दूरध्वनी करुन मागील चार वर्षांप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती  केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.

 दरम्यान, केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Govt's gift to 1 lakh employees of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.