सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:35 IST2023-11-10T08:35:35+5:302023-11-10T08:35:51+5:30
दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी
मुंबई : दिवाळीत सोमवार वगळता शनिवारपासून बुधवारपर्यंत सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी १३ नोव्हेंबर रोजीही विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने सरकारकडे केली आहे. दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.