शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 3:55 PM

bhagat singh koshyari letter to uddhav thackeray: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

ठळक मुद्देराज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्रअनेकदा राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेरांविरोधात ठाकल्याचे चित्रराज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर, कधीही लॉकडाऊनची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (corona virus) वाढती संख्या, कोरोना लसींचा तुटवडा, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी यांवरून महाविकास सरकारवर विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांनीही टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे सांगितले जात असून, याबाबत कधीही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (governor bhagat singh koshyari letter to cm uddhav thackeray over gudhi padwa)

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खटके उडून आरोप-प्रत्यारोप झालेले जनतेने पाहिले आहे. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी अशा अनेक कारणांमुळे राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिले आहे. 

“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”

राज्यपालांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांशी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोरोना नियंत्रण किंवा उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याचा ठपकाही केंद्रीय पथकाने ठेवला आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने सध्या राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. अशावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संवाद पुन्हा सुरु होणे, ही सकारात्मक बाब ठरु शकते, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgudhi padwaगुढीपाडवाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण