शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 22, 2016 03:59 IST

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले.

मुंबई : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना एसटी महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मशिन देण्यात आले. मात्र, कराराची मुदत संपल्यानंतर नियम डावलून पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीलाच चढ्या भावाने काम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एसटी महामंडळाने २00९ साली ट्रायमॅक्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन आणले. पाच वर्षांचा करार करताना, एसटी प्रशासन आणि ट्रायमॅक्स कंपनीत झालेल्या करारानुसार, वर्षाला ७५ कोटींपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्यास, प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराने ट्रायमॅक्सला पैसे मिळणार होते, तसेच ७५ कोटींपेक्षा कमी तिकिटे विकली गेल्यास भरपाई म्हणूनही एसटी प्रशासन ट्रायमॅक्सलाच पैसे देईल, असे त्यात म्हटले होते. हा अजब करार करताना एसटीने आपल्या नफ्याचा विचार केला नाही. त्यामुळे या कराराची त्या वेळी एसटीकडून चौकशी झाली आणि काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही सेवा पुढील दोन वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेण्याऐवजी, पुन्हा ट्रायमॅक्सला देण्याचा निर्णय घेतला. यात तिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने, एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी केली. तरीही राज्य सरकारने दुर्लक्षच केले आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की, चौकशी होणे गरजेचे होते. झालेला व्यवहार संशयास्पद असल्याने त्याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती, परंतु त्याची दखल राज्य सरकारने घेतली नाही. पाच वर्षांत ट्रायमॅक्सला जवळपास १५0 कोटी रुपये देण्यात आले. आता पुढील पाच वर्षांसाठी दुप्पटच पैसे मोजावे लागतील. हा व्यवहार खूपच खर्चीक असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)>२१ पैशांवरून ३३ पैशांवरतिकिटामागे २१ पैसे हा दर वाढवून ४१ पैसे करण्यात आला. मात्र, बरेच आरोप झाल्यानंतर अखेर ३३ पैसे एवढा दर ठेवण्यात आला, परंतु हा करारही संशयास्पद असल्याने, सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.