शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पॅथॉलॉजीबाबत सरकार अजूनही ढिम्म

By admin | Updated: June 15, 2015 02:30 IST

राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. या निदानाच्या काळाबाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि

पूजा दामले, मुंबईराज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. या निदानाच्या काळाबाजारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि परिषदेतही या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. या वेळी बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर सरकारतर्फे काहीही पाऊल उचलण्यात आलेले नाही. कारवाईच्या बाबतीत सरकार ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशन काही दिवसांवर आले आहे, पण कोणतीही कार्यवाही यासंदर्भात झालेली नाही. ठोस उत्तर न देता अजून वेळ लागेल, असे मोघम उत्तर विनोद तावडे यांच्यातर्फे त्यांचे मीडिया को-आॅर्डिनेटर गोविंद येतयेकर यांनी दिले. एमबीबीएस पूर्ण केल्यावर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या डॉक्टरांनाच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवण्याची मुभा आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पॅथॉलॉजिस्टची संख्या राज्यात अवघी २ हजार एवढी आहे. योग्य निदान न झाल्यास डॉक्टर योग्य ते उपचार करू शकत नाहीत. पॅथॉलॉजी शिक्षण न घेतलेल्या व्यक्ती स्वतंत्ररीत्या पॅथॉलॉजी लॅब चालवून रुग्णांची फसवणूक करीत आहेत. रुग्णांची फसवणूक थांबवली पाहिजे. पण अजूनही अध्यादेश निघालेला नसल्याने बोगस पॅथॉलॉजिस्ट फसवणूक करीत आहेत. आता कारवाईची वेळ आली असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रो बायोलॉजिस्ट या संघटनेने म्हटले आहे.