शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पोचालक वाहतूक संघटनेला सरकारने मदत द्यावी; राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:52 IST

कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे.

मुंबई: मुंबई राज्याची ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई शहरात जवळपास दोन कोटी इतकी लोकसंख्या मुंबई महानगरीत राहते. संपूर्ण देश व मुंबई लॉक डाउन करणे म्हणजे दोन कोटी लोकसंख्येला घरी थांबायला लावणे. कोरोनामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मुंबई शहरामध्ये 35000 काळीपिवळी टॅक्सी, 65000 खाजगी एसी टॅक्सी हे सर्व बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच खासगी बसेस टेम्पो वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या सर्व वाहतूक दारांचे हातावर पोट असल्यामुळे दिवसभर धंदा केला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. कोरोनामुळे आता परिस्थिती बिकट झाली असून दैनंदिन जीवन कशा पद्धतीने चालणार पुढील एकवीस दिवस कसे चालवणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालक वाहतूक संघटनेला राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ईमेलद्वारे पत्र पाठवून  केली आहे.

दिवसभर मुंबई शहरांत टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक मालक व खासगी बसेस यांनी जर काही काम धंदा केला तरच त्यांच्या घरची चूल पेटवू शकते. या सर्व लोकांचे हातावर पोट असल्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे बँकेचे कर्ज असते त्याच बरोबर इतर काही खर्च असतात. तरी यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाययोजना करून रिक्षा-टॅक्सी, खासगी बसेस व टेम्पो चालकांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे विषद केली.