शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील पोलिसांना सरकारने अतिरिक्त भत्ता द्यावा ; माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांची जनहित याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:37 IST

मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या पोलिसांना द्यावे इतर काम 

ठळक मुद्देपोलिसांना आरोग्यविषयक सुविधा देणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूदभविष्यात कोरोना सारख्या संकटांना सामोरे जाताना पोलिसांना अत्याधुनिक प्रकारचे प्रशिक्षण मिळावे

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदोबस्तात तैनात असणाऱ्या देशभरातील सर्व पोलीस बांधवांना सरकारने अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी करणारी जनहीत याचिका माजी निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या काळात पोलिसांचा पगार वाढवणे, तसेच पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा देणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. शुक्रवारी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अ‍ॅड. राजेश इनामदार , अ‍ॅड. अमित पै, अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांच्यामार्फत बर्गे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना बर्गे म्हणाले, एटीएस तसेच नक्षल भागात काम करणाऱ्या पोलिसांना दुप्पट पगार दिला जातो. सध्या जीवावर उदार होऊन पोलीस बांधव काम करत आहेत. अशावेळी सरकारने त्यांच्या पगारात कपात न करता त्यात वाढ केली पाहिजे. याबरोबरच पोलीस दलात उच्च रक्तदाब, मधुमेहच्या आजाराने त्रस्त असणारे कर्मचारी मोठया संख्येने आहे. त्यांना बंदोबस्ताची जबाबदारी देण्यापेक्षा इतर कार्यालयीन काम देण्यात यावे. ही जनहित याचिका दाखल करताना देशातील 35 राज्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या हरियाणा या राज्याने आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार दिला आहे. याबरोबरच पोलिसांवर हल्ले झाल्यास त्यासंबंधीच्या केसेस या फास्ट कोर्ट ट्रॅक मध्ये चालवाव्यात. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाने सगळ्यासमोर गंभीर चित्र उभे केले आहे. भविष्यात यासारख्या येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना पोलिसांना अत्याधुनिक प्रकारचे प्रशिक्षण मिळावे असेही बर्गे यांनी यावेळी सांगितले. ज्या भागात पोलीस बंदोबस्ताचे काम करत आहेत त्यांना सुरक्षा किट पुरवणे, तसेच त्याठिकाणी वैद्यकीय सेवेचा बंदोबस्त करणे, संवेदनशील भागात काम करताना पोलिसांना प्राथमिक उपचार मिळणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. काही राज्यांनी पोलिसांच्या पगारात कपात केली आहे. अशाने पोलिसांच्या मनात नाराजी असून ज्या राज्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे त्यांनी पोलिसांना कुठलीही कपात न करता पगार देणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय