शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या घरांसाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Updated: May 16, 2015 03:04 IST

एकीकडे कामाचा ताण असतानाच पोलिसांना घरांच्याही समस्या भेडसावत आहेत. ताण कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक पोलिसांना घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

नवी मुंबई : एकीकडे कामाचा ताण असतानाच पोलिसांना घरांच्याही समस्या भेडसावत आहेत. ताण कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक पोलिसांना घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. वाढत्या शहरीकरणात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली.नवी मुंबईचे शहरीकरण, जेएनपीटीचा विस्तार व सिडकोचे भविष्यातील गृहप्रकल्प यामुळे पोलीस आयुक्तालयावरील कामाचा ताण वाढणार आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना पोलीस कर्मचारी मात्र अपुरे आहेत. त्यामुळे पोलिसांपुढील समस्या जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त के.एल. प्रसाद यांच्यासह सर्व उपआयुक्त व पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरात सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे पसरवण्यात आले असून, लवकरच आणखी ७५० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. गुन्ह्यांची उकल होण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पोलीस वसाहतींची पडझड झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबांनाच जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. त्यामुळे अधिकाधिक पोलिसांना घरे देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. आवश्यक तिथे चार एफएसआय देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पनवेल परिसरात महामार्गालगतचे डान्सबार बंद करण्यासाठी पोलिसांनी तिथे छापे टाकावेत, असेही त्यांनी सुचवले. (प्रतिनिधी)