शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’, नाना पटोलेंची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:28 IST

Nana Patole Criticize Mahayuti Government: सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाहीत, बेरोजगांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

मुंबई - महाभ्रष्टयुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले आहे, राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला असून, कर्ज काढून कंत्राटदारांचे खिशे भरणे व त्यातून टक्केवारीची मलई खाण्याचा उद्योग सुरु आहे. सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाहीत. पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाहीत, बेरोजगांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. महायुती सरकारने जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी आणि शिंदे-पवार-फडणीस यांच्या पैशातून खर्च करावा, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महायुती सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व इतर सरकारी योजनांचा प्रचार राज्यभर करण्यासाठी योजनादूत नेमून त्यांना महिना १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी ३०० कोटी रुपांयाची तरतूद केली आहे. आधीच हे सरकार जाहिरातबाजी व इव्हेंटबीवर करोडो रुपये खर्च आहेत. आता पुन्हा प्रचार व प्रसारासाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे.

आमदारांना विकास निधी देण्यासाठी पैसे नाहीत, पैशासाठी सरकारी जमिनी विकू काय असे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात मग सरकारी योजनांच्या प्रचारासाठी ३०० कोटी रुपये कुठून आणले. कोणता सरकारी भूखंड विकून ३०० कोटी रुपये आणले हे अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांनी जनतेला सांगावे. तसेच बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी निवडणूक प्रचाराला लावले जात आहे. निवडणुका झाल्यावर सरकारची योजना संपणार आहे. नंतर या तरुणांनी काय करायचे? असा सवाल उपस्थित करून हा तरुणांचे भविष्य उद्धवस्त खाण्याचा सरकारचा डाव आहे का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सत्ताधारी पक्षांना पराभवाची धूळ चारली आहे, विधानसभेलाही लोकसभेसारखीच अवस्था होणार हे स्पष्ट असल्याने हे सरकार जाहिरातबाजी करण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करत आहेत. याआधी महायुती सरकाने जाहिरबाजीसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि आता पुन्हा ३०० कोटी रुपये? हा जनतेचा पैसा आहे, जनतेसाठी खर्च केला पाहिजे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी त्यांच्या खिशातून खर्च करावा, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये, असेही नाना पटोले म्हणाले.

महायुती सरकारने मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. अदानीला कवडीमोल भावाने जमिनी देत असताना आता दक्षिण मुंबईतील एक मोक्याच्या भूखंड कवडीमोल दराने एका शैक्षणिक संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. ही जागा देण्यास अर्थमंत्रालयाचा विरोध असतानाही जमीन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांना जागा नसल्याने भाड्याने जागा घेतल्या जात आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. हा भूखंड शैक्षणिक संस्थेस देण्यासाठी सरकारवर कोणाचा दबाव आहे, कोणाचे हित पाहिले जात आहे, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईतला हा मोक्याचा भूखंड देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार