शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचा लाभ देण्यास सरकारचा विलंब

By admin | Updated: January 18, 2017 06:16 IST

अत्याचार झालेल्या महिलांना व मुलांना, या योजनेचा लाभ देण्यास राज्य सरकार बांधील आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई: बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना व अत्याचार झालेल्या लहान मुलांसाठी असलेल्या पुनर्वसन योजनेचा लाभ पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याने, उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. योजना अंमलात येण्यापूर्वी अत्याचार झालेल्या महिलांना व मुलांना, या योजनेचा लाभ देण्यास राज्य सरकार बांधील आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नसल्याची माहिती सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी उच्च न्यायालयाला दिल्यावर, उच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले. ‘अशा पीडितांना सहाय्य करण्यास तुम्ही (राज्य सरकार) बांधील आहात. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर त्यांचे तातडीने समुपदेशन करणे आणि आर्थिक सहाय्य करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना मदत करून तुम्ही कोणतेही दान करत नाही किंवा अनुकूलताही दाखवत नाही आहात,’ असे न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही केसेसमध्ये ही योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सरकारने लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. (प्रतिनिधी)