शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी नोक-यांवर लवकरच सरकारी नियंत्रण

By admin | Updated: February 26, 2015 02:21 IST

खासगी क्षेत्रातील नोकऱ्या आणि त्यासाठी कार्यरत असलेल्या प्लेसमेंट एजन्सींचे कामकाज आता कायद्याच्या चौकटीत येणार असून

यदु जोशी, मुंबईखासगी क्षेत्रातील नोकऱ्या आणि त्यासाठी कार्यरत असलेल्या प्लेसमेंट एजन्सींचे कामकाज आता कायद्याच्या चौकटीत येणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र प्लेसमेंट एजन्सीज अ‍ॅक्ट’ येऊ घातला आहे. यासंदर्भात एका प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानांतर्गत खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आवश्यक असा कौशल्य आधारित कामगार/कर्मचारी/ अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणांवर कायद्याद्वारे नियंत्रण आणले जाणार आहे. खासगी कंपन्यांना कंत्राटी कामगारांचा पुरवठा करणाऱ्या प्लेसमेन्ट एजन्सीज कामगार कायद्याचे नीट पालन करतात की नाही, यावरही देखरेख ठेवण्यासाठी एका प्राधिकरणाची स्थापन करण्यात येणार आहे. येत्या काही वर्षांत खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी नोकऱ्यांचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक होत जाणार आहे. अशावेळी हे संपूर्ण क्षेत्र सरकारी नियंत्रणाच्या बाहेर ठेवणे म्हणजे नोकऱ्यांची गरज असलेले तरुण, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या आणि ज्यांच्या माध्यमातून त्या दिल्या जातात अशा प्लेसमेंट एजन्सी या तिघांना जोडणारा दुवा म्हणून नवे प्राधिकरण काम करेल.