शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शासनच जबाबदार

By admin | Updated: July 22, 2014 01:19 IST

अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले.

मुंबई : अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले. मात्र चारही बाजूने पडलेला आगीच्या ज्वाळांचा वेढा.. एका जवानाचा झालेला दुर्दैवी अंत या घटनेतून पुन्हा ‘संकटमोचक’ असणा:या अग्निशमन दलाच्या जवानांना संकटात अडकावे लागले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर युवा पिढीनेही इवलेकरांच्या मृत्यूला शासनच जबाबदार असल्याचे मत मांडले आहे. तर काहींनी शासन म्हणजे ही व्यवस्था बदलली पाहिजे, तरच समाजाबद्दलची संवेदनशीलता राज्यकत्र्याना जाणवेल, असेही मत मांडले. एरव्ही केवळ ‘सोशल’ नेटवर्किगवर अॅक्टिव्ह असणा:या तरुणाईने या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलीच, मात्र त्यापेक्षाही त्यांच्या मनातील व्यवस्थेबद्दलचा रोष कित्येक पटीने जास्त होता. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी त्यात सामील झालेच पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला आहे.
संकलन - स्नेहा मोरे
 
बिल्डरांना 
चाप बसवा
- किरण कोकरे
अंधेरी येथील दुर्घटनेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. कारण काचेच्या उत्तुंग इमारतींचे बांधकाम करणा:या बिल्डरांना राजकत्र्याची फूस असते. शिवाय, या बिझनेस पार्कमध्येही बडय़ा सेलीब्रिटींची कार्यालये आहेत. त्यामुळे या उंचच उंच बिल्डिंगचे बांधकाम करणा:या बिल्डरांना चाप बसवला पाहिजे. इवलेकरांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी बॉलीवूडच्या सेलीब्रिटींनी पुढाकार घेतला आहे, हे ऐकून बरे वाटले. मात्र या प्रक्रियेत दिखावा नसावा, त्याची केवळ चर्चा नसावी कृतिशील पुढाकार असेल तरच त्याचा उपयोग आहे.
 
जवानांच्या प्राणांची 
जबाबदारी कुणाची?
- मुकुलिना कोलते
अंधेरी लोटस बिझनेस पार्क दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नितीन इवलेकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी दिला. आपल्या येथील शासनाच्या उदासीनतेचे यापेक्षा मोठे उदाहरण नाही. अंधेरी येथील घटना उदाहरणादाखल आहे, मात्र अशा अनेक घटनांमध्ये शासनाने ‘कानाडोळा’ केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पुरेसे चांगल्या दर्जाचे सुरक्षा साहित्य मिळू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांत अग्निशमन दलाच्या गणवेशांचा, त्यांच्या घरांचाही प्रश्न उभा राहिला होता. राजकारण करून आपला ‘गल्ला’ भरणा:या राज्यकत्र्याना जाग येण्यासाठी अशा किती लोकांना प्राण द्यावे लागणार आहेत. त्यांच्या प्राणांची जबाबदारी कुणाची? याचे उत्तर राज्यकत्र्यानी द्यावे.
 
सुरक्षारक्षकांनाही 
द्यावे प्रशिक्षण
- अक्षया घाडीगावकर
अंधेरी येथे घडलेली दुर्घटना पाहता आता अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यालय परिसरातील सुरक्षारक्षकांनाही आग विझवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले पाहिजे. या घटनेदरम्यान इवलेकर यांच्या पत्नीने पालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन मागितले होते, यावर 
काही स्तरांतून टीकाही करण्यात आली. मात्र इवलेकर यांच्या पत्नीची 
ही भूमिका अत्यंत योग्य होती. कारण आधीच शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे इवलेकर यांचे प्राण गमावले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर शासनाच्या पाय:या ङिाजवण्यापेक्षा इवलेकर यांच्या पत्नीने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
 
सिस्टीम बदलली पाहिजे
- श्रुती राऊते
लोटस बिझनेस पार्कला लागलेली आग ही अत्यंत दु:खदच आहे. मात्र त्यात मृत्यू पावलेल्या इवलेकरांच्या कुटुंबीयांचा कणाच गमावल्याची सल त्यांना कायम राहील. इवलेकरांच्या जाण्याची ही उणीव भरून न येण्यासारखीच आहे, मात्र याला केवळ पालिका, बिल्डर जबाबदार नसून संपूर्ण व्यवस्थाच जबाबदार आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र यामध्ये पहिल्यांदा अग्निशमन दलाच्या जवानांना अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य पुरविले पाहिजे. जेणोकरून अग्निशमन दल सक्षम होईल.