शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडीत चिमुरडीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या

By admin | Updated: October 27, 2014 02:20 IST

घराबाहेर खेळणाऱ्या ११ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे

मुंबई : घराबाहेर खेळणाऱ्या ११ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. शिवाजीनगरातील बैंगनवाडी परिसरात ही चिमुरडी आई-वडील, दोन लहान भावंडं आणि आजीसोबत राहत होती. शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांकडे तसेच परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर तिच्या आई-वडिलांनी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून ती हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी देखील घटनेची गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर या मुलीचे आई-वडील, नातेवाईक आणि पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ काही रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी आले होते. यातील एका इसमाची उद्यानाजवळच असलेल्या कचराकुंडीकडे नजर गेली. या कचराकुंडीमध्ये एका चटईत काहीतरी गुंडाळल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ती चटई उघडून पाहिली असता यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ ही बाब शिवाजीनगर पोलिसांनी सांगितली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला. हत्या करणाऱ्या नराधमाने मुलीचे दोन्ही हातपाय दोरीने बांधले होते. तसेच तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला होता. पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवून तिच्या आई-वडिलांना याची महिती दिली. तसेच याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिवाय या परिसरातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे लवकरच यातील आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.