गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 15:15 IST2021-01-08T15:15:18+5:302021-01-08T15:15:59+5:30
Chief Minister Uddhav Thackeray : इंदिरा सागर राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पाला शुक्रवारी भेट दिल्यानंतर राजीव टेकडीवर आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
पवनी (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले केले. इंदिरा सागर राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पाला शुक्रवारी भेट दिल्यानंतर राजीव टेकडीवर आयोजित बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
राज्याचे तिजोरीत निधीचा खळखळाट आहे. त्यामुळे आश्वासन देणे संयुक्तिक होणार नाही, तरीही शेतकरी बांधवांना सिंचनाचे सोयीसाठी निधी उपलब्ध करून प्रकल्प पूर्ण करावाच लागेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी उमरेडचे आमदार राजू पारवे, तुमसरचे आमदार राजू कारेमोरे व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच सर्व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.