Google map shows villages in Maharashtra in Gujarat state | गुगल मॅपने दाखविली महाराष्ट्रातील गावे गुजरात राज्यात  

गुगल मॅपने दाखविली महाराष्ट्रातील गावे गुजरात राज्यात  

तलासरी : गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावात नियमित हद्दीचा वाद करून अतिक्रमण करीत असते. तसेच वेवजी गावातील ग्रामस्थांचा व गुजरात राज्यातील उंबरगाव येथील यंत्रणेचा नेहमीच वाद होत असतो. असे असताना आता गुगल मॅपनेही महाराष्ट्रातील तलासरी तालुक्यातील वेवजी गाव पूर्णपणे गुजरात राज्यात दाखवल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Google map shows villages in Maharashtra in Gujarat state)

गुजरात राज्य उंबरगावजवळ शिरकाव करत कुरापती काढत असताना आता गुगल मॅपनेही तालुक्यातील वेवजी गाव, इंडिया कॉलनी, मेहरणोस बोमान इंग्लिश शाळा तसेच मोठा भूभाग गुजरात राज्यात दाखविल्याने यामध्ये मोठे कारस्थान असल्याची शंका निर्माण केली जात आहे. याबाबत तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागाला पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Google map shows villages in Maharashtra in Gujarat state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.