शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

येत्या ४ व ५ ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 21:29 IST

आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता

ठळक मुद्देगेल्या २४ तासात कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

पुणे : संपूर्ण जुलै महिन्यात एकही कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण न झाल्याने देशात काही भागात मॉन्सूनची वृष्टी कमी झाली आहे. मात्र, येत्या ४ व ५ आॅगस्ट दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातील वारे हे अधिक वेगवान होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की,अरबी समुद्रावरुन येणारे वारे हे कमजोर होते. तसेच संपूर्ण जुलै महिन्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. त्यामुळे कोकणात पाऊस झाला असला तरी राज्यातील मोठ्या भुभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या सह्याद्रीच्या पूर्वकडील भागात पाऊस कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जूनमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये मोठा पाऊस झाला नाही. येत्या ४ व ५ आॅगस्ट रोजी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागाबरोबरच विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील वारे बळकट होऊन पश्चिम भागातील पावसाचा जोर वाढेल. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला. ३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात पाऊसमान कमीदेशाच्या ३६ हवामान विभागापैकी १४ विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. १९ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून ३ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला होता. आता जुलैच्या महिन्याअखेरीस हेच प्रमाण केवळ १२ टक्क्यांवर आले आहे. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्हा ३५ टक्के, नाशिक जिल्हा ३२ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात २०टक्के अधिक पाऊस झाला होता.परंतु, जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने आता २९ जुलै अखेर कोल्हापूर सरासरीच्या तुलनेत -१०, सातारा -२६, नंदुरबार -३३, पुणे २ टक्के अधिक आणि नाशिक येथे सरासरीइतका पाऊस झाला आहे़ त्याचवेळी मराठवाड्यात यंदा अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र